वेंगुर्ला
वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने १३ ते १५ जानेवारी या कालावधीत राऊळवाडा येथील पेट्रोलपंपानजिक ‘गरुडझेप महोत्सव २०२३‘चे आयोजन केले आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच आरोग्य आणि रक्तदानासारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत.
शुक्रवार दि.१३ रोजी सकाळी ९ वाजता अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या विद्यमाने आरोग्य शिबिर, सायंकाळी ७ वाजता ६०० किलो वजनी गटासाठी जिल्हास्तरीय खुली रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व चषक तसेच बेस्ट फ्रंटमॅन व बेस्ट लास्टमॅन यांना अनुक्रमे ५०० व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ४०० रुपये असून संघांनी स्वप्नील पालकर (८४८२८३५३९३) किवा केतन वेंगुर्लेकर (९६०४२६२७३३) यांच्याकडे ११ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करावी. प्रथम येणा-या १६ संघांनाच प्राधान्य दिले जाईल.
शनिवार दि. १४ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर, सायंकाळी ७ वाजता गुंडू सावंत आणि संदिप लोके यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना,
रविवार दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली आहे. पहिली ते दुसरीसाठी रंगभरण स्पर्धा असून प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५५५, ३३३, २२२, प्रमाणपत्र व चषक देण्यात येतील. तिसरी ते चौथीसाठी चित्रकला स्पर्धा असून प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ७७७, ५५५, ३३३ प्रमाणपत्र व चषक देण्यात येतील. पाचवी ते सातवी तसेच आठवी ते दहावीच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असून प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ११११, ७७७, ५५५ प्रमाणपत्र व चषक देण्यात येतील. पहिली ते दुसरी व तिसरी ते चौथी यांनी चित्र रंगविण्यासाठी तेलखडू तर पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीच्या मुलांनी वॉटर कलरचा वापर करावा.
सायंकाळी ७ वाजता विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, त्यानंतर ८ वाजता कै. सुधीर कलिगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘अजिक्यतारा २‘ हा ट्रीकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.
तिन दिवस चालणा-या या महोत्सवादरम्यान विक्रेत्यांना आपापले स्टॉल लावण्यासाठी गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी स्वप्नील पालकर (८४८२८३५३९३) किवा मंगेश परब (८१४९६१७२०९) यांच्याशी संफ साधावा.
स्थळ :- नायरा पेट्रोल पंप जवळ, राऊळवाडा, तालुका वेंगुर्ला