You are currently viewing पालकांच्या योग्य संस्कारवरच मुलाचे भवितव्य अवलंबून

पालकांच्या योग्य संस्कारवरच मुलाचे भवितव्य अवलंबून

अभिलाष अवस्थी;निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

सावंतवाडी

पाल्यावर पालकांनी केलेल्या योग्य संस्कारावरच आपल्या मुलाचे भवितव्य अवलंबून आहे. शिक्षणातील विविध संधी त्यांना प्राप्त होऊ शकतात, असे प्रतिपादन हिंदी साहित्य अकादमीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभिलाष अवस्थी यांनी निरवडे येथे केले.

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी अवस्थी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिंधुदूर्ग जिल्हा शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, मुंबईचे पत्रकार अनंत मेस्त्री, जव्हार राठोड, दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर जैन, पाटील निलेश जैन, निरवडे सरपंच शिवानी गावडे, न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, निरवडे माजी सरपंच हरि वारंग, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष अशोक घोगळे, सहसचिव नेहा भिसे, मॅनेजमेंट सदस्य जया भारती, मुख्याध्यापक गजानन पालेकर, विष्णू परब, राजन कालवणकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अवस्थी पूढे म्हणाले, मुलांची आवड महत्त्वाची असते त्याचबरोबर पालकांनी पण आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा विषय तसेच विविध उपक्रमात आपल्या मुलांचा सहभाग दाखवून त्यांचा सर्वांगण विकास साधण्यासाठी पालकांनी मुलाचे सहकार्य गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्कार नॅशनल स्कूल मधील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध स्पर्धात्मक उपक्रमात प्राविण्य बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार तसेच चांगली कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांचा व कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी शालेय जीवनात मुलांनी कोणते ज्ञान आत्मसात करावे तसेच स्पर्धा उपक्रमात कसा सहभाग घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले. संस्कार नॅशनल स्कूल हे आधुनिक दर्जाचे स्कूल असून या ठिकाणी दर्जात्मक शिक्षण देण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी पालकांनी आपल्याला योग्य ते सहकार्य करावे व मार्गदर्शक करून येथील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक उपक्रम कसे राबविता येतील याकरिता आपणास सहकार्य करावे, असे मत यावेळी दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चंद्रशेखर जैन यांनी मत व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी मुलांनी स्पर्धात्मक उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या सर्वांगीण विकास साधावा, असे मत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन काका सावंत व शुभम धुरी यांनी केले. त्यानंतर स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा