देवगड
पुन्हा एकदा बिबट्याने देवगड मळई येथे प्रवेश केला असून मळई येथे सकाळी ११ वाजता दिवसाढवळ्या झालेल्या बिबट्याचा लाईव्ह दर्शनाने मळई परिसरात घबराट पसरली आहे. बिबटयाने एका वासराचा फडशा पाडला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.
देवगड मधील मळईवाडी येथे पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजविण्यास सुरूवात केली आहे.गतवर्षी जुलै महिन्यात मळई येथीलच मनोज धुरी यांची तीन गुरे बिबट्याने मारून दशहत निर्माण केली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी बिबट्याने पुन्हा एकदा मुक्त संचार करण्यास सुरूवात केली आहे.आता बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर हा चर्चेचा विषय बनला आहे.गुरूवारी सकाळी ११ वा.सुमारास देवगडहून मळइकडे जाणाèया रस्त्यावरील मुख्य उतारावरच संतोष कणेरकर हे टेम्पो घेवून मळईमध्ये जात असताना बिबट्याचे लाईव्ह दर्शन झाले.त्याचवेळी मळई येथून कॉलेजला जाणाऱ्या दोन विद्यार्थीनीच्याही बिबट्या नजरेस पडल्याने त्यांची भीतीने गाळण उडाली.त्या दोन्हीही विद्यार्थीनी ओरडत परत धावत मागे घरी गेल्या.मळईमधील स्थानिकांनाच बिबट्याचे दिवसाढवळ्या लाईव्ह दर्शन झाल्याने परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.तसेच दोन दिवस बेपत्ता असलेल्या किशोर कणेरकर यांचा छोटा पाडाही गुरूवारी सकाळी मृतावस्थेत समद शेख यांच्या बागेत सापडला.त्याचाही बिबट्याने फडशा पाडला असून यामुळे मळई मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा बिबट्याचा लाईव्ह दर्शनाने परिसरात घबरहाट पसरली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.