*बाळासाहेब साळुंखे परिवाराचा नेत्रदान जागृतीचा स्तुत्य उपक्रम*
निगडी प्राधिकरण-(प्रतिनिधी)
वाढदिवस असो वा विवाहाचा वर्धापन दिवस…प्रत्येकजण आपापल्या परीने आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. वाढदिवसानिमित्त केक कापणे, भेट वस्तू आदानप्रदान, स्नेह भोजन, पार्टी असे विविधरंगी आयोजन असते. अनेक श्रीमंत कुटुंबं मोठमोठ्या हॉटेलमधील हॉल मध्ये सोहळा दणक्यात साजरा करतात. परंतु बाळासाहेब आणि कुसुम साळुंखे दांपत्याने मात्र आपल्या लग्नाचा ५० वा वर्धापन दिवस मात्र अनोख्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
बाळासाहेब आणि कुसुम साळुंखे यांनी आपल्या विवाहाच्या ५० व्या वर्धानदिनानिमित्त स्नेह मेळावा आयोजित केला होता. आपले स्नेही, हितचिंतक यांना नेत्रदान संमती फॉर्म देऊन भरून घेतले. समाजोपोगी कार्य करत साळुंखे दांपत्याने सोहळ्यातील समाजहित जपण्याचा संदेश दिला. यावेळी आदित्य बिर्ला नेत्रपेढी चिंचवडचे डॉ. रामदास, डॉ. महेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.