You are currently viewing कितीही दबाव आला तरी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही – आम. वैभव नाईक

कितीही दबाव आला तरी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही – आम. वैभव नाईक

कणकवली :

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची मोजमापं घ्यायला एसीबीच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. आज कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांच्या राहत्या निवासस्थानाची आणि त्यांच्या अन्य मालमत्तेची मोजमापे घेण्यात आली.

वैभव नाईक म्हणाले या सगळ्या कारवाया कुणाच्या दबावाखाली सुरू आहेत हे जनतेला माहीत आहे. या दबावाला घाबरून आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आल्यानंतर आता आमदार वैभव नाईक यांचे कणकवलीतील घर, शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज, क्रशर तसेच हळवल येथील पाईप फॅक्टरी या सर्व ठिकाणच्या बांधकामाची त्यावेळच्या दरानुसार व्हॅल्युएशन करून अहवाल सादर करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यामुळे आमदार वैभव नाईकांवरील या कारवाई ला आता नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. कणकवलीत आज ही मोजमापे घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे.

आपल्यावर कुणाच्या दबावाखाली कारवाई सुरू आहे हे जनतेला माहीत आहे. कितीही दबाव आला तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. आपली वडिलोपार्जित जागा आहे त्याच जागेत मी घर बांधलेले आहे. शिवाय माझे सर्व व्यवसाय मी गेले कित्येक वर्ष करत आहे. त्यात कुठेही लपवाछपवी केलेली नाही. त्यामुळे या कारवाईला मी घाबरत नाही. कितीही दबाव आला तरी शिवसेनेतून बाहेर पडणार नाही, असेही आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा