You are currently viewing बांदा शहराला अग्निशमन यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन द्या..

बांदा शहराला अग्निशमन यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन द्या..

शहारातील विविध प्रश्नांकडे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वेधले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष..

बांदा

आपत्कालीन परिस्थितीत सोईचे व्हावे यासाठी बांदा शहराला अग्निशमन यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन द्या तसेच कायम स्वरुपी पोलिस पाटील यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी बांदा भाजपाच्या माध्यमातून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान याबाबत आपण लवकरच आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देईन, असे आश्वासन श्री. चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. बांदा येथील विविध प्रश्नांकडे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, माजी पंचायत समिती सभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, प्रशांत बांदेकर, शाम मांजरेकर, राजाराम सावंत, शैलेश केसरकर, मकरंद तोरसकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा