वेंगुर्ला
कै. डॉ. अतुल मुळे यांच्या स्मरणार्थ रविवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
हृदयरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रकांत चव्हाण व चेस्ट फिजिशियन डॉ.संजय पवार हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. गरजू रुग्णांनी येताना सर्व जुने रिपोर्टस् व प्रिस्क्रिप्शन्स घेऊन यावेत. अधिक माहितीसाठी संगिता मुळे (९४२३३०१३००) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन कै.डॉ.अतुल मुळे स्मरण समिती, वेंगुर्लातर्फे केले आहे.