मा.केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांच्या यांची संकल्पना – श्री विष्णू मोंडकर,अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांची माहिती
मालवण :
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकारने मान्यता मिळूनही जिल्ह्याचा अपेक्षित पर्यटन विकास झाला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मूलभूत पर्यटन सेवेची गैरसोय आहे. जिल्ह्यात येणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांना उत्तम सेवा देण्याच्या उद्धेशाने केंद्रीय मंत्री मा .नारायण राणे साहेबाच्या सूचनेनुसार टुरिझम, सर्व्हिस क्लस्टर बनविण्यासंदर्भात पर्यटन व्यावसायिक महासंघ व केंद्रीय क्लस्टर अधिकारी यांची हॉटेल श्री महाराज येथे बैठक झाली. पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या हस्ते एमएसएमई संचालक डीवोफो मुंबई श्री ए आर गोखे, क्लस्टर डेव्हलपमेंट अधिकारी श्री अभय दफ्तरदार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी क्लस्टर बनविण्यासंदर्भात श्री ए आर गोखे व श्री अभय दफ़्तरदार म्हणाले की जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक असलेल्या सेवा स्थानिक व्यापारी वर्गाच्या माध्यमातून उपलब्ध करणे लॉंड्री, टूर्स ट्रॅव्हल, सेंटराईज किचन, होम स्टे, लॉजींग, जलक्रीडा व्यावसायिक यांना आवश्यक स्टाफ तसेच कोकणी खाद्यपदार्थ तसेच शंख शिंपले तसेच लाकडी खेळणी यांची आंतराष्ट्रीय स्तरावर विक्री व्यवस्था उभी करणे अशा प्रकारच्या अनेक सेवा उद्योगाचा समावेश असणार असून यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यापारी बांधवासाठी अनुदान तत्वावर खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच ब्रॅण्डिंग उत्पादनासाठी तसेच सेवा व्यवसायासाठी अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध होणार आहे तसेच क्लस्टर बनविण्यासाठी व्यापारी वर्गाची परिपूर्ण माहिती तक्ता बनविण्याविषयी मार्गदर्शन केले यासंबंधी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने क्लस्टर योजनेत समाविष्ट होणाऱ्या व्यापारी वर्गाची माहिती एकत्र करून जिल्ह्यात टुरिझम सर्व्हिस क्लस्टर स्थापन करण्याचे पर्यटन महासंघातर्फे ठरविण्यात आले. तसेच या सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी सहकार्य करणारे माजी खासदार श्री निलेश राणे यांचे ही पर्यटन महासंघाच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी पर्यटन महासंघाचे पदाधिकारी श्री गुरुनाथ राणे, श्री रवींद्र खानविलकर, श्री मंगेश जावकर, श्री दादा वेंगुर्लेकर, श्री मिलिंद झाड व अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते अशी माहिती पर्यटन महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली.