You are currently viewing कुडाळ शिवसेना शाखेत ममता दिनानिमित्त माँ साहेब स्व. मीनाताई ठाकरे यांना अभिवादन

कुडाळ शिवसेना शाखेत ममता दिनानिमित्त माँ साहेब स्व. मीनाताई ठाकरे यांना अभिवादन

आ.वैभव नाईक यांच्या हस्ते मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा ९२ वा जयंती दिन म्हणजेच ममता दिन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ शिवसेना शाखेत साजरा करण्यात आला. यावेळी आ.वैभव नाईक यांच्या हस्ते मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सचिन काळप, जीवन बांदेकर, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, अमित राणे, गुरू गडकर, मंगेश बांदेकर, नितीन सावंत, सचिन गावडे, महेश जामदार, सूर्या घाडी, सागर भोगटे, संदीप म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा