You are currently viewing सावंतवाडी शहरालगतच्या “खोल”गावात कुंभयाळवाडीतील भव्य क्रिकेट स्पर्धेच्या आडून सजल्या जुगाराच्या मैफीली

सावंतवाडी शहरालगतच्या “खोल”गावात कुंभयाळवाडीतील भव्य क्रिकेट स्पर्धेच्या आडून सजल्या जुगाराच्या मैफीली

सावंतवाडी पोलिसांची धडक कारवाई संशोधनाचा विषय*

जत्रोत्सवांचा जोर ओसरताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोकळ्या असलेल्या शेतमाळ्यांमधून भव्य अशा क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आहे. अनेक गावांमध्ये आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्पर्धेच्या निमित्ताने मोठमोठे जुगारी एकत्र येत जुगाराचे पट बसवतात. क्रिकेट स्पर्धेसाठी लागणारी पाच दहा हजाराची बक्षिसे आपल्या नावाने देत या स्पर्धांच्या आडून लाखो रुपयांची उलाढाल होणारी जुगाराची मैफिल सजवली जाते. यामध्ये दूर दूर वरून कोल्हापूर गोवा अशा ठिकाणाहून मोठमोठे जुगारी आपले नशीब आजमावण्यासाठी येतात.
सावंतवाडी शहराच्या लगत असलेल्या *खोल* गावात कुंभयाळवाडी येथे आज सुरू असलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या आडून जुगार्यांनी जुगाराच्या मैफिली सजविल्या होत्या. येथील बीट अंमलदारांनी समज दिल्यानंतर काही वेळ पांगलेल्या जुगाऱ्यानी पुन्हा एकदा जुगाराच्या मैफिली बसवून खुलेआम जुगार खेळण्यास सुरुवात केली होती. सावंतवाडी पोलिसांना याचा सुगावा लागतात सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई करून जुगार खेळणाऱ्यांचे मनसुबे उध्वस्त केले. सावंतवाडी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत कोणावरही अटकेची कारवाई केली नाही त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी सवकलेल्या जुगाऱ्यांकडून मैफिली सजविल्या जाण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जरी जुगार्यांना तिथून हुसकावून लावले तरी पुन्हा जुगाराच्या मैफिली बसू शकतात. त्यामुळे अशा अवैद्य धंदे करणाऱ्या लोकांपासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी जुगार्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा