शिष्यवृत्ती नवीन अर्ज नोंदणी व जुन्या अर्जाचे नुतनीकरणासाठी मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
महाडिबीटी प्रणालीवर सन 2022-23 करिता भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवगासाठी 20 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण्याची प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. जिल्हयातील सर्व कनिष्ठ ,वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करणेत येते की, जे विद्यार्थी स्कॉलरशिप योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण त्वरीत करुन घ्यावेत. वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव जिल्हा समाज कल्याण कार्यालयकडे वर्ग करणेबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी तात्काळ कार्यवाही करावी.
शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करणेबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,कार्यालय सिंधुदुर्गनगरी दूरध्वनी क्र.02362-228882 येथे संपर्क साधावा.