*काव्यनिनाद साहित्य मंच पुणेच्या सदस्या लेखिका कवयित्री प्रतिभाताई पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिसत तसं नसतं*
दिसत तसं नसतं
म्हणून जग फसत
माहीत असलं तरी
मन विश्वास ठेवतं
फसव्या गोड शब्दांचा
मोह पडतो मनाला
विसरून मागचे सगळे
भुरळ पडते जीवाला
अशाश्वत जीवनाचे
रहस्य कळले कुणाला
आनंद मानून घ्यावा
मिळणाऱ्या क्षणाला
बुरखा खोट्या भावनांचा
फार काळ नाही टिकणार
सत्य कधीतरी पडद्यातून
जगा समोर हळूच येणार
शिकावे थोडे फार जगाकडून
दुसऱ्याच्या आनंदासाठी
घ्यावा खोटेपणा स्वीकारून
बनावे प्रेमाने आधारकाठी
हसत घालवावे जीवन
थोडे खोटे वागावे
दुःख वेदना लपवून
जगाला फसवत राहावे
प्रतिभा पिटके
अमरावती
9421928413