जिल्हा बँकेच्या पडेल शाखेच्यावतीने करण्यात आला प्रदान
देवगड
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना अंतर्गत पडेल मधील गोखले कुटुंबाला 3 लाख 33 हजार 750 रुपयांची आर्थीक मदत प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवती बँक शाखा-पडेल यांनी पडेल येथील श्रध्दा मनिष गोखले यांना दोन लाखांचा धनादेश सुपुर्द केला आहे.
मनिष गोखले यांचे रोजी निधन झाले. हे वृत्त समजल्यावर जिल्हा बँकेच्या पडेल शाखेकडून विम्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूर होऊन दोन लाख रकमेचा धनादेश पडेल शाखेकडून गोखले यांच्या पत्नी मनिषा गोखले यांना जिल्हा बँक संचालक ॲड. प्रकाश बोडस यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यामध्ये प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना 2 लाख तर एटिएम विमा किसान क्रेडिट अंतर्गत 1 लाख 33 हजार 750 अशी मिळून 3 लाख 33 हजार 750 रुपयांची आर्थीक मदत जिल्हा बँकेडून देण्यात आली आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक एडवोकेट प्रकाश बोर्डस पडेल सरपंच भूषण पोकळे माजी सरपंच संजय मुळम, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे बँक इन्स्पेक्टर संजय घाडी शाखा प्रबंधक अतुल पडेलकर मंगेश घाडी नुरुद्दीन काझी,बँकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.