दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यातील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते व उद्योग आधार सेलचे अध्यक्ष रामदास मेस्त्री यांना सेनेतर्फे नवीन जबाबदारी देण्यात आली. त्यांना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिव उद्योग सहकार सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा दोडामार्ग तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली.
शिव उद्योगआधार सहकार सेनेचे अध्यक्ष हेमंत दीक्षित यांच्या सहीचे नेमणुक पत्र आज त्यांना देण्यात आले. सेनेच्या आखून दिलेल्या ध्येय धोरणानुसार पक्षवाढीसाठी काम करण्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या निवडीबद्दल रामदास मेस्त्री यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे