देवगड :
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री देवी भगवतीचा वार्षिक यात्रोत्सव 6 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. या कालावधीत पूजा, नैवद्य, देवीला साडी नेसवून दागदागिने घालणे, गाऱ्हाणे व ओट्या भरणे कार्यक्रम त्यानंतर गोंधळी, नौबत, पुराण वाचन, गोंधळ / कीर्तन, तर पाचव्या दिवशी रात्री संगीत भजने, पुराण प्रवचन, पलाखी सोहळा, नवसाची गाऱ्हाणी, कीर्तन आणि लळीताच्या कार्यक्रमाने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व भक्तांनी यात्रा स्वर उपस्थित राहून श्री भगवती देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री देवी भगवती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व ग्रामस्थांनी केले आहे.