सावंतवाडी :
सावंतवाडी येथील प्रसिद्ध व्यवसायिक पाटणकर गॅस सर्व्हिसचे संचालक रामप्रसाद पाटणकर व संचालिका सौ. ऋचा पाटणकर यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. ऋत्विज पाटणकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या वैद्यकीय सुपरस्पेशालीटी परीक्षेत यश प्राप्त केले असून एम सी एच यूरोलॉजी उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ते पहिले एमसीएच यूरोलॉजिस्ट ठरले आहेत.
डॉ. ऋत्विज पाटणकर हे 2017 मध्ये झालेल्या पहिल्या राष्ट्रीय नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेतून विजयवाडा आंध्र प्रदेश येथील डॉक्टर पी.एस.आय.एम.एस ॲण्ड आर.एफ या वैद्यकीय महाविद्यालयात किडनी व मूत्रविकार यावरील शल्यचिकित्सक पदव्युत्तर सुपर स्पेशालिटी एम सी एच यूरोलॉजी मध्ये गेली तीन वर्ष कार्यरत होते. यूरोलॉजी या विभागात मुतखडा प्रोस्टेट ग्रंथींचे विकार किडनी मूत्राशयातील कॅन्सर यावर उपचार होण्याबरोबरच किडनी ट्रान्सप्लांट करता येते.
आंध्र प्रदेश राज्याची शासकीय महाविद्यालयाची एम सी एच यूरोलॉजी ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात पार पडली. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारी मध्ये पी.एस.आय.एम.एस ॲण्ड आर.एफ या वैद्यकीय महाविद्यालय हे कृष्णा जिल्ह्याचे मुख्य जिल्हा रुग्णालय असल्याने कोरोना वाॅर्ड ची ड्युटी व अभ्यास करत त्यांनी हे यश संपादन केले आहे. डॉ. ऋत्विज यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले एमसीएच यूरोलॉजिस्ट बनले आहेत.