You are currently viewing क्रांतीज्योती

क्रांतीज्योती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री रेखा काळे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*क्रांतीज्योती*

सावित्रीबाई आहे महान
गाऊ तीचे गुणगान
स्त्री शिक्षणाने वाढविला
जगती स्त्रीचा बहुमान !!

चूल आणि मूलच होते
स्त्रीचे अवघे विश्व
शिक्षणाने मिळाले तीला
चौफेर धावण्यास अश्व !!

पहिली स्त्री शिक्षिका
नावलौकिक मिळविला
जोतीरावांच्या पाठींब्याने
स्त्री शिक्षणाचा पाया रचला !!

शेण गोळे झेलले
बहुत सोसले कष्ट
समाजप्रबोधनाच्या कार्यावर
येऊ न दिले अरिष्ट !!

सामाजिक विषमतेला
प्रहार केला जोरदार
अनिष्ट रूढी परंपरांना
केला तीव्र प्रतिकार !

समाजसुधारक थोर
ज्योतिबा आणि ‌सावित्री
कार्याने झाली अजरामर
धन्य ज्ञानदायी, ज्ञानज्योती !!

क्रांतीज्योतीच्या धैर्याने
महिला सक्षमीकरण झाले
आज प्रत्येक क्षेत्र
तिनं पादाक्रांत केले !!

रेखा काळे
अहमदनगर

प्रतिक्रिया व्यक्त करा