You are currently viewing सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २०२३ आयोजन समीती अध्यक्षपदी अॅड नकुल पार्सेकर यांची निवड.

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २०२३ आयोजन समीती अध्यक्षपदी अॅड नकुल पार्सेकर यांची निवड.

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहिद जवान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची मुले, भटक्या जाती, विमुक्त जाती, अनु जाती , जमाती यांची अनाथ मुले मुली अशां घटकांना या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजनात प्राथमिकता दिली जाणार असून सदर सामुदायिक विवाह सोहळा हा दिनांक १ फेब्रुवारी २०२३ते ३१मे २०२३ या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडावा यासाठी सिंधुदुर्गच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त मा. निकम मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडलेल्या सभेमध्ये सिंधुदुर्गच्या आयोजन समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली असून या आयोजन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर यांची निवड करण्यात आली असून इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे
सचिव श्री अशोक पाडावे आचरा, उपाध्यक्ष फादर मनवेल फर्नांडिस, सावंतवाडी, खजिनदार श्री गोविंद नार्वेकर, कणकवली, सहसचिव अॅड पुर्वा ठाकूर ओरस,सन्माननीय सदस्य सर्वश्री डॉ. प्रल्हाद प्रभुसाळगांवकर, शिरोडा, शिवराम काणेकर, माणगाव, रंजन वाळके माणगाव, अभय सकाळी, जयंत राय, आरवली, सदानंद हाडकी,शिरोडा, विनायक कांबळे, रेडी, मिलिंद प्रभूमिराशी.
नवनियुक्त समितीचे मा.सहाय्यक धर्मादाय आयुक्त निकम मॅडम यांनी अभिनंदन केले असून सदर उपक्रम समाजातील सेवाभावी संस्था आणि इतर घटकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडण्याचे आवाहन केले. नवनियुक्त अध्यक्ष अॅड नकुल पार्सेकर यानी सर्वानी परस्पर सहकार्याने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची विनंती केली.
कार्यालयीन अधिक्षक मि. भुईवंर यांनी सर्व उपस्थिताचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा