४ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान होणार कोकण महोत्सव
मुंबई प्रमोद कांदळगावकर
उत्सव परिवार, श्री गणेश मित्र मंडळ व श्री समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून भांडुप पश्चिमेच्या कोकणनगर येथील स्व. अटलबिहारी वाजपेयी मैदान, (मनपा मैदान) येथे,बुधवार दिनांक ४ जानेवारी ते रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३
या कालावधीत भव्य दिव्य २५ वा भव्य कोकण महोत्सवाचे आयोजक सलग बारा दिवस सुप्रिया सुजय धुरत यांनी केले असून
या कार्यक्रमाला लघु ,उद्योग व सूक्ष्म केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या महोत्सवाचे निमंत्रण स्वीकारले आहे.
25 व्या कोकण महोत्सवाला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
माजी खासदार निलेश राणे
आमदार नितेश राणे, सह या महोत्सवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मिला ठाकरे मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसे नेते शिरीष सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी येण्याचे निश्चित केलेले आहे.
या भव्य दिव्य महोत्सवात कोकणातील प्रसिद्ध पौराणिक दशावतार कंपन्यांची नाटके, विविध कोकणी नृत्य,नमन, भारुड, बालानृत्ये, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत भजनाची डबलबारी,महिलांसाठी खेळ , चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,
खेळ पैठणीचा, लोकरंग सांस्कृतिक मंच प्रस्तुत गणगौळण लावणी बतावणीचा कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध स्पर्धा,लहान मुलांसाठी फनफेअर होणार आहे. अखिल भांडुप कलाकार कट्टा, सुप्रसिद्ध जेडी कराओके गायनाचा कार्यक्रम , तसेच महोत्सवात कोकणातील मालवणी मसाले, मासळी, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही उभारले जातील, अशी माहिती कोकण महोत्सवाचे आयोजक राजदत्त सुजय धुरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी,
उत्सव परिवाराचे अध्यक्ष सुजय धुरत, सुप्रिया धुरत,दिलिप हिरनाईक, विजय जोशी,किशोर गावडे,मानसी धुरत, सुरेश सावंत, संतोष राणे, विनायक सनये, प्रसाद येरम, स्वप्निल राणे, सिद्धेश दळवी, बबन गावडे, गिरीश कळंबे,या महोत्सवाच्या जय्यत तयारीला लागले आहेत.
यावेळी आयोजनाबाबत सुजय धुरत म्हणाले की, कोकणाचे पर्यटन आणि खाद्य संस्कृती याला चालना देण्यासाठी भांडुप पश्चिममध्ये २५ वा कोकण महोत्सव आयोजन केले आहे.
यंदाचा या कोकण महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात अनेक उद्योजक मोठ्या उत्साहात सहभागी झाले असल्याचे सुप्रिया सुजय धुरत यांनी सांगितले. यावेळी उद्योजक व्यावसायिकांना आपल्या उद्योग समूहाची जाहिरात करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना हाती घेतल्याचे सुजय धुरत यांनी सांगितले.