बांदा
भारतीतील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बांदा नं. १केंद्रशाळेत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.या दिवशी राबवण्यात आलेल्या उपक्रमामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी बनला .
या दिवशी शाळेतील विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले, व विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या लक्षवेधी वेशभूषा साकारलेल्या होत्या.
या वेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक व पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा उलगडला. तसेच स्त्री ची महती विषद करणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले. या वेळी विद्यार्थ्यांनी बांदा येथील नट वाचनालयाला भेट देऊन विविध पुस्तके, वर्तमानपत्र व मासिके यांची माहिती घेतली.
या दिवशी दुपारच्या सत्रात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बांदा येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानाला क्षेत्रभेट देऊन या उद्यानात मनोसोक्तपणे खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.
हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक जे.डी.पाटील, रंगनाथ परब,प्रशांत पवार, गोपाळ साबळे,जागृती धुरी, शुभेच्छा सावंत,वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील,शितल गवस व पालकांनी परिश्रम घेतले.