वेंगुर्ला / पाट :
एस एल देसाई विद्यालय, पाटच्या विद्यार्थ्यानी विविध क्रीडा प्रकारात यश मिळवलेले आहे. या प्रशालेतून जिल्हास्तर विभाग स्तर, राज्यस्तरावर तसेच विविध क्रीडा प्रकारात बरेच विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यामुळे येथील सर्व क्रीडा प्रकारांचा विकास होण्याकरिता चांगले कीडांगण, चांगले क्रीडा साहित्य आवश्यक असून क्रीडा विकास निधी मधून या विद्यालयाला मदत मिळावी म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष श्री. राजन तेली यांच्याकडे क्रीडा साहित्य प्रस्ताव सादर करण्यात आला.
यावेळी हा प्रस्ताव सादर करताना भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, श्री. सुहास गवंडळकर तालुकाध्यक्ष, श्री. निलेश सामंत माजी सभापती, श्री. गुरूनाथ मडवळ ग्रामपंचायत सदस्य म्हापण, श्री. विजय ठाकुर, श्री. संजोग परब, श्री. विनीत कीनळेकर, श्री. प्रसाद पाटकर उपस्थीत होते.
पाट विद्यालय हे पंचक्रोशी मधील मोठे विद्यालय असुन या निधीचा पंचक्रोशीतील सर्वच खेळाडूना लाभ होणार आहे. या विद्यालयात क्रिडा कला विज्ञान या विषयामधील विविध उपक्रम वर्षभर घेतले जातात. त्यामुळे या प्रस्तावाला निश्चीतच यश मिळेल असे मान्यवरांनी सांगीतले.