You are currently viewing सावंतवाडीतील लाखे वस्तीचे लवकरात लवकर सुशोभीकरण करा

सावंतवाडीतील लाखे वस्तीचे लवकरात लवकर सुशोभीकरण करा

रासाई कला, क्रीडा मंडळाकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

सावंतवाडी

येथील लाखे वस्ती साठी मंजूर झालेली कामे तात्काळ करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथे रासाई युवा कला, क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी पालिकेकडे करण्यात आली आहे.

वस्तीत गार्डन, गटारावरील फरशी नवीन विहिर आदी कामासाठी निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंडळाचे अध्यक्ष दीपक लाखे व नरेश खोरागडे यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या वस्तीसाठी मंजूर झालेली कामे लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी केली.

दरम्यान याबाबत लवकरच पाठपुरावा करण्यात येईल. ही कामे तात्काळ सुरू करण्यासंदर्भात आमचा विचार सुरू आहे, असे श्री. जावडेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा