You are currently viewing व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडियमच्या एमएसएफसी विभागाला बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून प्रात्यक्षिक साहित्य

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडियमच्या एमएसएफसी विभागाला बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून प्रात्यक्षिक साहित्य

बांदा

श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशाळेच्या एम. एस. एफ. सी. विभागाला प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून उपलब्ध करून देण्यात आले. नुकतेच बँकेच्या अधिकारी अश्विनी अशोक यांच्या हस्ते साहित्य प्रदान करण्यात आले.

यामध्ये सी कटर, ग्राफ्टिंग कटर, डिजिटल बीपी किट, वॅट मीटर, व्होल्ट मीटर या प्रात्यक्षिक साहित्य खरेदीसाठी आवश्यक निधी देण्यात आला. यासाठी बँकेचे मॅनेजर अंकीत धवन यांनी सहकार्य केले. दहावी मधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक साहित्य शाळेला भेट देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, विभाग प्रमुख रिना मोरजकर, एम.एस. एफ. सी. विभागाचे समन्वयक राकेश परब, निदेशक भिकाजी गिरप, निदेशिका सौ. रिया देसाई, सौ. गायत्री देसाई आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा