You are currently viewing काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या खासदार फंडातून अनेक विकास कामे मंजूर

काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या खासदार फंडातून अनेक विकास कामे मंजूर

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती.

सिंधुदुर्ग

काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांच्या खासदार फंडातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. सदर कामांचे अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यासंदर्भात नियोजन विभागाकडून संबधीत खात्यांना कळविण्यात आले आहे.
सदर विकास कामे खालील प्रमाणे आहेत.
1)मालवण तालुक्यातील बुधवळे माळशेतवाडी येथे स्मशानभूमीशेड उभारणे. स्मशानशेड पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण व कुंपण उभारणे.
2)कुडाळ तालुक्यातील पावशी घावनळे मुख्य रस्ता ते वायंगणवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
3)वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला शहर महाजनवाडी येथील अजित परब यांचे घर ते शिरोडकर यांचे घरा पर्यंत जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे.
4) कणवलीत तालुक्यातील तरळे बाजारपेठ येथील रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधणे.
5) दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे- शेळपीवाडी मारुती मंदिर समोर सभामंडप बांधणे.
6) कुडाळ तालुक्यातील माणगांव धरणवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
7) देवगड तालुक्यातील जामसंडे येथील तलावाजवळ पिंडदान विधीसाठी बांधण्यात आलेला चौथरा पक्का करणे व त्यावर पत्र्याची शेड बांधणे.
8) सावंतवाडीत तालुक्यातील सांगेली टेमकरवाडी येथे रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधणे.
येणा-या काळात काँग्रेसपक्षा मार्फत अजून मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यातील विकास कामांसाठी आणणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा