बांदा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाअंतर्गत दोडामार्ग तालुक्यात निवडण्यात आलेल्या कडशी नदीच्या उगमस्थान ते गोवा सीमेपर्यंतच्या पात्रालगत गावात उद्या सोमवार दिनांक २ रोजी नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
. सकाळी ९ वाजता पडवे माजगाव येथून संवाद यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी नदी वाहणाऱ्या ६ गावातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, गाव पाणलोट समिती, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील वनपारिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, ग्रामीण स्वच्छता उपविभागाचे उपअभियंता, वरिष्ठ भू वैज्ञानिक आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
. या नदी संवाद यात्रेत गावातील लोकांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच चला जाणूया नदीला या उपक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन या अभियानाचे कार्यकारी अभियंता जि. एच. श्रीमंगले यांनी केले आहे.