You are currently viewing ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेली कामे खासदारांमुळेच झाली, तेलींनी फुकाचे श्रेय घेऊ नये – संजय पडते

ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेली कामे खासदारांमुळेच झाली, तेलींनी फुकाचे श्रेय घेऊ नये – संजय पडते

कुडाळ

ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेली दीडशे किलोमीटरची रस्त्याची कामे ही केवळ खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे झाली आहेत. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आयत्या जेवणावर ताव मारू नये, असा सल्ला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला आहे. आम्ही विकास केला असे सांगणाऱ्या तेलींनी उद्धव ठाकरे यांनी मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम का थांबले? आणि ते थांबविण्यामागे कोण आहे? याची माहिती द्यावी असाही सवाल त्यांनी केला आहे. श्री. पडते यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतुल बंगे उपस्थित होते.

यावेळी पडते म्हणाले की, मागच्या काळात जिल्हा परिषदेत झालेला वॉटर पुरिफायचा भ्रष्टाचार कोणी केलाय, तो करण्यासाठी कोणी दबाव आणला, हे आता लवकरच बाहेर येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा