You are currently viewing आई हिराबेन

आई हिराबेन

काव्य निनाद साहित्य मंच पुणे सदस्या सौ कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

आई हिराबेन

धन्य ती आई हिराबेन
जिने जन्म दिला हिऱ्याला
आईचे पाय धुवून लावतात
पंतप्रधान मोदी डोळ्याला

आईने जीवनी घडवला
मोदीजींसारखा हिरा
त्यामुळे भारत देश हा
सोन्यासम घडला खरा

गरिबीला सामोरे जात
केला आईने संघर्ष
मोदीजींच्या जीवनी
आईमुळे झाला उत्कर्ष

कोट्यावधीतुन एकदा
हे चित्र पाहायला मिळे
आईची जीवनी महती
प्रत्येक लेकराला कळे

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + one =