*वक्रतुण्ड साहित्य समूहाचे अध्यक्ष जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*
*अध्यात्माच्या प्रांगणात..*
*पाठबळ….*
काही दिवसांपुर्वी माथेरानला सहलीला गेलो होतो.अन माथेरानच्या घनदाट जंगलातला तो प्रसंग अजुनही आठवतो.माथेरानच्या जंगलातुन रस्त्याने जात असतांना,अचानक, अगदी पुढ्यातुन मुंगुसांची पिल्लं अन् मुंगुस वाट ओलांडून जातं होते. अगदी आजुबाजुला पहात जमीन हुंगत शांतपणे रांगेत चालतं होते.अन पिल्लांच्या रक्षणासाठी सर्वांत शेवटुन पाठीमागून मुंगुस येत होतं. हे पाहून जरा आस्चछर्य वाटंत होतं.कारण सहसा जंगली प्राण्यांमध्ये कुटुंबप्रमुख पुढे असतो, इथे तर मुंगुस पाठिमागुन येत होतं.काय कारण असेल असं सहज वाटुन गेलं…..
साप आणि मुंगसाचं वैर हे तर सर्वांना माहीत आहेच. अन् कदाचित ह्या वैरामुळे एखाद्या सापाने आपल्या बेसावध अशा नवजात पिलांवर झडप घालून चावा घेवु नये ह्यासाठी मुंगुस पिल्लांच्या पाठिशी राहुन लक्ष ठेवंत असेल. पिल्लांच्या रक्षणासाठी हे सारं काही प्रेममयी काळजीचं हे दर्शन पासुन क्षणभर स्तिमित झालो. …….
नित्यनेमाने स्वामी समर्थांच्या मंदिरांत जात असे ,अन् तिथेही “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”हे अगदी ठळकपणे लिहिलेलं दिसतं असे,अन् हळूहळू ,खरोखरच त्या वाक्याचा अर्थ ऊमगु लागला.”मी तुझ्या पाठीशी आहे ह्या एका वाक्यांत प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद आहे,अन् ती ताकद आपल्यावर असणार्या जिवापाड प्रेमाचं प्रतीक आहे असं मला वाटतं, आपण जर एखाद्यावर अतुट श्रद्धा ठेवून चाललो तर तीच श्रद्धा आपल्याला एक अनमोल विश्वासचं वरदान किंवा भेट देत असते.अन त्यालाच पाठबळ असं म्हटले जातं.. पन् श्रद्धा डोळपनाची असायला हवी एवढं मात्रं खरं.. नाही तर, आपल्या अतिविश्वास हा घातक ठरु शकतो ह्याकडे विषेश लक्ष द्यायला हवं…
पाठबळ, आत्मविश्वास, किंबहुना, प्रोत्साहन हे विविध शब्द असले तरी सर्वसाधारणपने हृयाचा एकंच अर्थ अन् तो म्हणजे “” ह्या जगात तु एकटा नाही कुणितरी तुझ्या पाठीशी असुन तो, संकटातुन तुला वाचवत असतो तसं त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही….
अन् हे अगदी बरोबर आहे..कारण, आपल्यासोबत सदैव दिव्य अशी शक्ती आहे अन् ती म्हणजे जिव अथवा प्राण.. ह्या सृष्टीत सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व आहे ,अन् त्यामुळे सर्व सृष्टीचं कार्य अविरतपणे सुरू आहे.पन आपण मात्रा सृष्टीतल्या घडामोडींमुळे घाबरत असतो..कारण आपण स्वतः ईश्वराचा अंश आहे हे विसरून जातो अन् घाबरून जातो..,
जन्माला येताना मुंल बाहेरच्या कोलाहलामुळे घाबरून जातं पन् जेव्हा आईचा तो कोमल स्पर्श जाणवु लागतो तेव्हा त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होवुन ते आईच्या कुशीत बिनघोरपने विसावत.. त्याला आईचं ते पाठबळ एक नविन उत्साह, धैर्य, आत्मविश्वास हे सर्वकाही देवून जातं.. अन् त्याचा दृढ विश्वास वाढ़ंत जातो तसतसं अधिक पाठबळ मिळत जात.. आपल्या सोबत कुणीतरी आहे हा दृढ विश्वासानं., पाठबळ अधिक घट्ट होत जातं..
हृया पाठबळाबाबत महाभारतातील अत्यंत विलक्षण अशी एक घटना आठवली,
कौरवपांडवांच युद्ध हे अटळ असल्याने, कौरव अन् पांडव हे कुरुक्षेत्रावरील घनदाट जंगल भुमिगत करुन जमिन सपाट करु लागले. मोठमोठी झाडे तोडु लागले अन् त्यामुळे त्या झाडावरील पक्षी,तेथुन लांब निघून जावु लागले,, तेव्हा एका हत्तीच्या सोंडेने झाड जमिनदोस्त करताना त्या झाडावरील इवली इवली पिल्लं असलेलं चिमनिचं घरटं खाली पडलं.अन नेमके त्या ठिकानावरुन, भगवान श्रीकृष्ण आजुबाजूचा परिसर न्याहाळत होते, तितक्यांत घरट्यातली चिमणी भुर्रकन ऊडंत येवुन श्रीकृष्णाच्या खांद्यावर बसली अन् चिवचिवाट करु लागली, जणु ती कृष्णाला सांगत होती, “की माझं काय चुकलं?आता मी माझ्या पिल्लांना घेवून कुठे जावु? मी निरपराधी असताना माझं इवल्याशा पिल्लांचंहे माझं घरटं हृया मानसानी हत्तीकडुन तोडलं, आता मी अन् माझ्या पिल्लाचा जिव कसा वाचवु??” कृष्ण समजायचं ते समजून गेले,, त्यांनी त्या चिमणिच्या पाठीवर हात फिरवला अन् म्हणा ले”घाबरु नकोस, फक्त २१दिवस पुरेल एवढा दाना पाणी शोधून आणि अन् आपल्या घरट्यात निस्चींत रहा,”भिवु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ”
कृष्णाचं पाठबळांचं हे बोलणं ऐकुन अगदी निस्चिंतमनाने ती दाणा पाणी शोधण्यासाठी,दुर निघुन गेली..
युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश. करुन नंतर अगदी सर्वप्रथम हातात धनुष्य बाण घेवून त्या बाणाने हत्तिच्या गळ्यातील घंटेचा वेध घेतला अन् काही क्षणातच घंटेचा टनत्कार होवुन ती अवाढव्य घ़ंटा चिमणीच्या घरट्यावर तिरपी पडली.. अन् २१दिवसपर्यतच्या घनघोर युद्धातही ती चिमणी आपल्या पिल्लांसहीत तिथे जमिनीवरच्या आपल्या घरट्यात अगदी सुखरूप राहिली..
खरोखरच, पाठबळाची किमया ही शब्दात वर्णन करण्यासारखी नाही… आयुष्यात पाठबळ असायला हवे.मग ते आईवडिलांचे असो किंवा मित्रमंडळी, गुरुजन , समाज अथवा जिवनसंगीनी, आपली अर्धांगिनीचे असो.. शेवटी पाठबळावरंच आपण आपल्या ईच्छीत स्थळी निश्चिंतपने पोहचु शकु..
©️जगन्नाथ खराटे-ठाणे
३०डिसें२०२२