जिल्हा पोलीस प्रमुखांच्या संकल्पनेतून मालवणात जनजागृती कार्यक्रम…
मालवण
सध्याच्या डिजिटलच्या युगात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने नागरिकांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी सतर्कता बाळगायला हवी. सोशल माध्यमांचा वापर करतानाही आपला डाटा चोरीस जाता नये याबाबतही सावध रहायला हवे असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांनी येथे केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतुन कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी, पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या उपस्थितीत येथील रॉकगार्डन येथे सायबर क्राईम, महिलांविषयक गुन्हे याबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे यांच्यासह पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान तसेच पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या बँड पथकाचा वादनाचा कार्यक्रम पार पडला.
खोत म्हणाल्या, सोशल माध्यमे हाताळताना विशेष काळजी घ्यायला हवी. काही वेळेस तुमच्या मेलवर मोठ्या प्रमाणात मेल पाठवून मेल आयडी क्रश केला जातो. त्यामुळे याबाबत आपण सतर्क रहायला हवे. यासाठी इमेलचा आयडी सातत्याने बदलायला हवी. सोशल मीडियावर कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला वैयक्तिक माहिती देऊ नये आई आवाहन त्यांनी केले.