*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम भावगीत*
*चंद्र हसला गाली*
*(भावगीत )*
शुभ्र वस्त्र लेउनी चांदणी आली
चंद्र पौर्णिमेचा हा हसला गाली !! धृ!!
पाहून रूप चंद्र होई बेभान
चांदणीच्या मनी उठले तुफान
मखमली ही काया लज्जेत न्हाली
चंद्र पौर्णिमेचा हा हसला गाली!!1!!
अबोल प्रीतीची ती अबोल भाषा
हर्षाने मनमोर वाजवी ताशा
स्वप्नवेडी ती बाला चंद्राची झाली
चंद्र पौर्णिमेचा हा हसला गाली!!2!!
नजराणा प्रीतीचा पाहतो वारा
शीळ घालुनी त्यांना छेडीतो तारा
उजळला मुखडा पसरे लाली
चंद्र पौर्णिमेचा हा हसला गाली ॥ 3 ॥
*✒️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*