राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या प्रयत्न यश
राज्यातील शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनाला शिक्षक पुरस्कार देऊन राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते.परंतु तीन वर्षापासुन हे पुरस्कार वितरीत करण्यात आले नव्हते .कोरोना असल्यामुळे पुरस्कार प्रस्ताव घेतले नाहीत व वितरीत करण्यात आले नाहीत असे सांगण्यात येत होते.परंतु राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी तत्कालिन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची वेळोवेळी भेट घेऊन राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरीत करण्यात यावेत अशी मागणी करून सतत पाठपुरावा केला होता .या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्यातील शिक्षकांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते.आॅनलाईन मुलाखती घेण्यात आल्या होत्या परंतु पुरस्कार यादी जाहिर करण्यात आली नव्हती.५सप्टेंबर शिक्षक दिनाला वितरण होणे आवश्यक होते परंतु याच कालावधीत सरकार बदल्यांच्या कारणाने सर्व प्रक्रीया रखडली होती.सरकार बदल्या नंतर हे पुरस्कार जाहिर होऊन वितरीत करणे आवश्यक होते परंतु परंतु पुरस्कार जाहिर होत नसल्याने मुलाखत झालेल्या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली होती.यामुळे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी अनंता जाधव, दशरथ शिंगारे,माधव वायचाळ,पाकिजा पटेल,बळीराम चापले,सुनिल गुरव,सुनिल नायक ,भिमराव शिंदे यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची मुंबई व नागपूर येथे भेट घेऊन राज्य पुरस्कार जाहिर करून वितरीत करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती.यावेळी शिक्षणमंत्री व ग्रामविकासमंत्री यांनी ३१डिसेंबर २०२२पर्यंत पुरस्कार जाहिर करून ३जानेवारी २०२२ला वितरीत करण्यात येतील असे आश्वासन संघटना पदाधिकारी यांना दिले होते . मंत्रीमहोदय यांनी दिलेलेआश्वासनानुसार आज राज्य पुरस्कार जाहिर केले आहेत.शासनाने राज्य पुरस्कार जाहिर केल्याबद्दल राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त संघटनेच्या वतीने शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.