*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नदी मिळे सागराला*
स्वअस्तित्व संपवून
नदी मिळे सागराला,
ध्येय मिळाल्याचा तिला
आनंद असतो झाला..।१।
सागरी विलीन होणे
कर्तव्य तिचे असते,
आपण संपलो याचे
दुःख नदीला नसते..।२।
कुणा डोंगरामधूनी
प्रवाह वाहत येतो,
बघता बघताना तो
रूप नदीचे घेतो..।३।
तहानल्यांची तहान
भागविते आनंदाने,
फुलविते आजुबाजू
भाकरीकरीता दाणे..।४।
सागराला मिसळता
संपतात स्वप्न सारे,
अमृताचे जल तिचे
होवूनी जातात खारे..।५।
तरी नदीला असते
तीव्र समुद्राची ओढ,
मानवा जाग मिठाला
साखरेशी नाते तोड..।६।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*