*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्य-चरितावली
*।। काव्य-पुष्प -तिसरे-।।*
———————————————–
श्रीमहाराजांचे वडील रावजी
ना केली लबाडी, ना फसवेगिरी
बाह्यस्वरूपी अबोल स्वभावाचे
अंतरी अखंड स्मरण पांडुरंगाचे ।। १ ।।
श्रीमहाराजांच्या मातोश्री गीताबाई जबाबदारी सारी स्वीकारे सुनबाई
व्यावहारिक भार संसाराचा वाही
“गीतामाय “आल्या गेल्याचे पाही ।।२ ।।
रावजी-गीताबाईस सत्पुरुष भेटे
श्रीफल प्रसादाने मन संतोषले
यथावकाश डोहाळे सुरू झाले
गीतामायचे अखंड रामनाम चाले ।। ३ ।।
काव्यचरित लेखने आनंद होई
कवी अरुणदास भावुक होई
।। जय श्रीराम ।।
————————————————-
कवी अरुणदास “अरुण वि देशपांडे-पुणे
9850177342
———————————————