*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हे कविते…!*
मनातलं बरंच काही मला
कवितेस सांगायचंय…
तिच्याशिवाय कोण ऐकतोय मला..?
सुख दुःख सारं तिच्यासमोर मांडायचंय…
ती शब्दबध्द करते माझ्या मुखातून प्रसवलेल्या अक्षरांना…
छान लयीत बसवते प्रत्येकाला ओळीत, रांगेत…
शाळेतील नवशिक्या कोवळ्या मुलांना बसवतात तसेच…!
कधी कधी गुणगुणायला लावते…
आनंदाने सुरात गाते सुद्धा घसा कोरडा पडेस्तोवर…!
वृत्तातल्या शब्दांवर ती खूप प्रेम करते…
सहज लयीत येतात म्हणे…!
लावणीवर तर ठुमक्यात फेर धरते…
लाजते मुरडते… इश्श…!
मुखडा पदराच्या आड लपविते…
गझलेवर तर जीव ओवाळून टाकते…
भावभक्तिने गीत गाते…
म्हणून तर कवितेस सांगायचंय…
असंच जप सरस्वतीच्या लेकरांना
तुझ्यासाठीच तर ती दुडदुडत धावतात
एका मागोमाग एक रांगतात…
तुझ्यामुळेच चालायला शिकतात
कुणाच्यातरी मुखात रुळतात
मधाळ वाणीतून बरसतात…
मंत्रमुग्ध करून चिंता विसरायला लावतात…!
त्यांना सर्वोंमुखी असंच बागडू दे
कविता बनून…!
मला राहू देत
निमित्तमात्र…!
©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६