You are currently viewing १५ जानेवारी पर्यंत खार बंधाऱ्याचे काम पूर्ण करा

१५ जानेवारी पर्यंत खार बंधाऱ्याचे काम पूर्ण करा

अन्यथा शेतकरी व ग्रामस्थ यांचे रास्ता रोको आंदोलन;कृषी संघटन कांदळगावचे अध्यक्ष उमेश कोदे यांचा इशारा

मालवण

कांदळगाव व हडी या दोन्ही गावांना लाभदायक ठरलेल्या शासनाचा खारभूमी विकास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या खार बंधाऱ्यावर पावसाळ्यानंतर बसविण्यात येणाऱ्या चिखलफळ्य आद्यपही बसविण्यात आल्या नसल्याने अमावस्येच्या उधाणात कांदळगावातील १०६ हेक्टर शेतजमिनीत खारे पाणी घुसल्याने शेतजमीन नापीक बनण्याचा धोका निर्माण झाला असून लगतच्या विहिरींचे पाणीही खरे बनल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे १५ जानेवारी पर्यंत खार बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले नाही, तर शेतकरी व ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन छेडतील असा इशारा कृषी संघटन कांदळगावचे अध्यक्ष उमेश कोदे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

खार बंधाऱ्याला चिखलफळ्या न बसविल्याने कांदळगाव येथील १०६ व हडी येथील ११८ हेक्टर शेतजमिनीत कोणत्याही क्षणी खारेपाणी शिरण्याचा निर्माण झाला असून संपूर्ण शेतजमिन नापिक होणार असून नदी परीसरातील सर्वा पाण्याच्या पाणी खारट होऊन परीसरातील ग्रामस्थांने आरोग्य धोक्यात येणार आहे तसेच परीसरातील माड, सुपारी, केळी व रब्बी शेती तसेच बागायती नष्ट होण्याचा गंभीर धोका निर्माण होणार आहे. गुरांच्या वैरणीचा पुत्र सुध्दा निर्माण होणार आहे, असे उमेश कोदे व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अमावस्येच्या उधाणात या खार बंधाऱ्याचे पाणी कांदळगावच्या शेतजमिनीत घुसले आहे. यामुळे शेतजमीन नापीक बनण्याचा धोका आहे. तर गुरांना चरण्यासाठी वैरण नाहीसे झाले आहे. तर नदी लगतच्या विहिरींचे पाणी खारे झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यातील वाढत्या क्षार मुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, असे उमेश कोदे व ग्रामस्थांनी म्हटले आहे.

संबंधित कार्यालयाशी ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व शेतकरी ग्रामस्थांकडून लेखी व दुरध्वनीमार्फत विनंत्या करूनही खारबंधाऱ्याच्या कामाबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसून दरवर्षी या प्रश्नाबाबत संबंधित खात्याकडून हलगर्जी केली जाते व लाभधारकांचे नुकसान होते, असेही उमेश कोदे यांनी म्हटले आहे. याबाबत १५ जानेवारी पर्यंत कार्यवाही न झाल्यास रास्तारोको करण्याचा इशारा उमेश कोदे व ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा