सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या संवाद यात्रा सुरु करण्यापुर्वी संबंधित विभागाकडून कडशी नदी मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये आयोजित केलेली कडशी नदी संवाद यात्रा अतंर्गत चर्चासत्र व बैठकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून या बैठका व चर्चासत्र जानेवारी 2023 च्या पहिल्या व दुसऱ्या सप्ताहात घेण्याचे नियोजन,असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गो. ह. श्रीमंगले यांनी दिली आहे.
तथापि या गावांमध्ये आताच ग्रामपंचायत निवडणुका होवून नविन ग्रामपंचायत सदस्यांची नियुक्ती झालेली असून दिनांक 30 डिसेंबर 2022 पर्यंत या गावांमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची बैठक व उपसरपंच पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम नियोजित आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणुया नदीला’ या अभियानांतर्गत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कडशी नदीच्या काठावर वसलेल्या मोरगाव,पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये कडशी नदी संवाद यात्रेचे आयोजन दि. 28 ते 29 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.