You are currently viewing लांजा तालुक्यातील पन्हळे धरणासाठी १ कोटीचे दुरुस्ती बजेट मंजूर…

लांजा तालुक्यातील पन्हळे धरणासाठी १ कोटीचे दुरुस्ती बजेट मंजूर…

तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना

– खासदार विनायक राऊत

रत्नागिरी-
सिंधुदूर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी आज लांजा तालुक्यातील पन्हळे धरणांची पाहणी केली. या धरणास गळती लागल्याने तातडीने डागडुगी करण्यासाठी सौ.वैशाली नारकर अधिक्षक अभियंता पाठबंधारे मंडळ रत्नागिरी यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये धरणातील पाणी प्रथम कमी करुन १ कोटी रुपये दुरुस्तीसाठी बजेट मंजूर झाले असून तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. व इतर कालव्या संदर्भात कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, रत्नागिरी जिल्हा समन्वयक शरद जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन सदस्य व उद्योजक किरण सामंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, शिवसेना लांजा तालुकाप्रमुख संदिप दळवी, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, कार्यकारी अभियंता श्री.पाटील व लांजा तहसिलदार श्री.ओमासे, लांजा उपतालुकाप्रमुख सुरेश करंबळे, राजापूर उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, जि.प.अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ.स्वरुपाताई साळवी, जि.प.सदस्य चंद्रकांत मणचेकर, लांजा सभापती  सौ.लिला घडशी, उपसभापती सौ.दिपाली दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, लांजा शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, माजी नगराध्यक्ष राजू कुरूप, विभागसंघटक रविंद्र डोळस,  विभागप्रमुख शरद चरकरी, गवाणे उपविभागप्रमुख सिध्देश पांचाळ, उपविभागप्रमुख राजेंद्र पालये, सहकार विभागप्रमुख प्रकाश गुरव, लांजा नगरसेवक राजू हळदणकर, प्रसाद भाईशेटये, मंगेश बापेरकर, स्वरुप गुरव, वैभव जोईल, सचिन डोंगरकर, मा.सरपंच तुकाराम मसणे, जनक जागुष्टे, रामदास खानविलकर, विजय जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा