You are currently viewing ग्रा.पं. निवडणुकीत काँग्रेसचे उपसरपंचपदी विजयी उमेदवार चंदन  हाडकी यांचा जिल्हा काँग्रेसकडून सत्कार

ग्रा.पं. निवडणुकीत काँग्रेसचे उपसरपंचपदी विजयी उमेदवार चंदन  हाडकी यांचा जिल्हा काँग्रेसकडून सत्कार

वेंगुर्ला

शिरोडा ग्रामपंचायत उपसरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चंदन सदानंद हाडकी हे 10 विरूद्ध 6 मतानी विजयी झाले.  सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, वेंगुर्ला शहर अध्यक्ष तथा वेंगुर्ला नगरपरिषदेतील काँग्रेसचे माजी गटनेते प्रकाश डिचोलकर, वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच चंदन हाडकी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच लतिका लक्ष्मण रेडकर, सदस्या अनिश्का आनंद गोडकर, प्रथमेश गणेश परब, राजन यशवंत धानजी, नंदिनी अनिल धानजी, पांडुरंग बाबू नाईक,यश परब, तात्या हाडकी, सदानंद हाडकी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा