सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आसनी रिक्षाचालक व मालकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, अशी’ मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय शारबिद्रे व सेक्रेटरी सुधीर पराडकर यांनी दिली.
प्रलंबित मागण्यांसाठी गेली दोन वर्षे शासनस्तरावर वारंवार मागणी करूनही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ऑटो रिक्षा संयुक्त कृती समिती अध्यक्ष बाबा कांबळे, बाबा आढाव, सचिव नितीन पवार तसेच कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर, सचिव जितेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात १९ डिसेंबरला रिक्षाचालकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. परंतु या कालावधीत जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने व आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याचे पालन करून १९ डिसेंबरचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
त्यामुळे संघटनेने २६ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले