You are currently viewing सेवांगण येथील स्कॉलरशिप, बुद्धीबळ प्रशिक्षण वर्गास विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद

सेवांगण येथील स्कॉलरशिप, बुद्धीबळ प्रशिक्षण वर्गास विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद

मालवण

साने गुरुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सेवांगण तर्फे सुरु असणाऱ्या स्कॉलरशिप आणि बुद्धीबळ प्रशिक्षण वर्ग यांची पालक सभा नुकतीच संपन्न झाली.यावेळी व्यासपीठावर सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर, कोषाध्यक्ष दिपक भोगटे, सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर, विश्वस्त किशोर शिरोडकर, सौ. ज्योती तोरस्कर आणि प्रशिक्षिका मनाली वेंगुर्लेकर उपस्थित होते.

सुरुवातीला साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सर्वांनी म्हटली. सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी साने गुरुजींबद्दल माहिती दिली. साने गुरुजींची एकशे चौदा पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे वाड:मय चिरतरुण असून ते सर्वांनी वाचावे असे आवाहन त्यानी केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्याना प्रवेश नव्हता, यासाठी त्यांनी दहा दिवस प्राणातिक उपोषण करून अस्पृश्याना मंदिर प्रवेश मिळवून दिला. हे फार मोठे कार्य त्यांनी केले आहे. असेही त्यांनी सांगितले.

संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मुलांनी सराव परिक्षेमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक करून यापुढे पालकांनी त्यांचा घरी अभ्यास करून घ्यावा. जास्तीत जास्त परीक्षेचा सराव करून घ्यावा. यासाठी मार्गदर्शन केले. प्रशिक्षिका वेंगुर्लेकर यांनी मुलांच्या सराव परिक्षेमध्ये झालेल्या चुका कश्या वगळता येतील यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मुख्यत्वे करून मुलांचे एका जागी दीड तास बसून पेपर सोडविणे काही विद्यार्थ्यांना जमत नाही तसेच गडबडीने काही चुका करतात यावर जर पालकांनी लक्ष दिल्यास आपले पाल्य निश्चित यश मिळवू शकेल, असे सांगितले.

सौ. ज्योती तोरस्कर यांनी मुलांच्या एकंदरीत यशाबाबत कौतुक करून मुलांनी यापुढे आपले लक्ष केंद्रित करून अभ्यास केल्यास आणि पालकांनी तो करून घेतल्यास नक्की यश मिळविता येईल, याची ग्वाही दिली. स्कॉलरशिप सराव परीक्षा आणि बुद्धिबळ मध्ये यश मिळविणाऱ्या पहिल्या पाच क्रमाकांना पुस्तक भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शेवटी संस्थेचे सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, सेवांगण कर्मचारी उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा