कणकवली
शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प.पू.भालचंद्र महाराज संस्थाच्या शैक्षणिक मंडळातर्फे कणकवली कॉलजेच्या एचपीसीएल सभागृहात जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. या वर्गाचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या झाले.
यावेळी प.पू.भालचंद्र महाराज संस्थाचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळुसकर, कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले, दादा नार्वेकर, अशोक सापळे, प.पू.भालचंद्र महाराज संस्थाच्या शैक्षिणक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर, दिवाकर मुरकर, मार्गदर्शक अमोल नवलपुरे, कल्याण कडेकर, संजय कोरके, सदानंद गावकर, रावजी परब, किरण कोरगावकर, मंगेश तेली, काशीराम कसालकर, सुधाकर आरोलकर, श्रीकृष्ण कांबळी, शरद हिंदळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अमोल नवलपुरे यांनी प. पू. भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षिणक मंडळाच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन व शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या उपक्रमाचे कौतूक केले.
या मार्गदर्शनपर वर्गात अमोल नवलपुरे यांनी बुद्धिमता, कल्याण कडेकर यांनी गणित व संजय कोरके यांनी गणित – बुद्धिमता या विषयांवर विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. हा वर्ग सकाळी १०.३० ते ४.३० यावेळेत पार पडला. यात ५ वी,८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी प्रत्येकी ३ तासिका घेण्यात आला. गजानन उपरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व्ही. टी. सुतार यांनी केले. आभार सदानंद गावकर यांनी मानले. या मार्गदर्शन वर्गाच्या आयोजन, नियोजन आणि यशस्वीतेसाठी विजय केळुसकर, गजानन उपरकर यांच्या मार्गदर्शनासाठी प्रकाश परब, काशीनाथ कसालकर, विष्णू सुतार, मंगेश तेली, किरण कोरगावकर, सदानंद गावकर, शरद हिंदळेकर, सुहास आरोलकर, श्रीकृष्ण कांबळी, रावजी परब यांच्यासह शैक्षिणक मंडळाच्या सदस्यांसह
संस्थानाच्या कर्मचाऱ्यांनी परिक्षम घेतले.