कुडाळ
कुडाळ आगारातून सायंकाळी सुटणारी कुडाळ अणाव मार्गे सुकळवाड-ओरोस ही एस टी बस उशिराने सुटत असल्याने शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पंणदुरतिठा प्रशालेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा सुटल्यानंतर तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. तरी ही बस पंणदुर येथे सायंकाळी पाच वाजता येईल या दृष्टीने नियोजन करावे. अशी मागणी सुकळवाड ग्रामस्थांनी कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सुकळवाड ,अणाव येथील विद्यार्थी मोठ्या संखेने पणदूर येथील शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सोयीची असलेली कुडाळ आगारातून सायंकाळी सुटणारी एसटी बस शाळेच्या सुटन्याच्या वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा ५ वाजता सुटली तरी एस टी बस ६ वाजे पर्यंत येत नाही. त्यामुळे विद्यार्थी वेळेत काळोख होण्यापूर्वी घरी पोहोचत नाहीत. त्यामुळे पलकांची चिंता वाढली आहे. कुडाळ येथून पणदूर-अनाव मार्गे सुकळवाड ओरोस या मार्गावर सायंकाळी एकच बस असल्याने दूसरा पर्याय नाही.सदर एस टी बस शाळा सुटण्याच्या वेळेत येण्याच्या दृष्टीने नियोजन केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल. विद्यार्थ्यांचे वेळेचे नियोजन बिघडणार नाही.व् अंधार पड़ण्यापूर्वी त्याना सुखरूप घरी जाता येईल. तरी याबाबत सकारात्मक विचार करून एस टी बस चे नियोजन करावे अशी मागणी सुकळवाड ग्रामस्थानी कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सुयोग धमापुरकर,काशीराम पाताडे, लीलाधर पाताडे, संदीप चव्हाण,राजकुमार मुंणगेकर, उत्तम पाताडे, आदि उपस्तित होते.