You are currently viewing पाट हायस्कूलचे शिक्षक प्रशांत चव्हाण यांचा कोकणरत्न पुरस्कार देऊन गौरव

पाट हायस्कूलचे शिक्षक प्रशांत चव्हाण यांचा कोकणरत्न पुरस्कार देऊन गौरव

 

 

दरवर्षी या संघटनेच्या वतीने कोकण रत्न पुरस्कार दिला जातो शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व क्रीडा इत्यादी क्षेत्रात भरीव योगदान देत असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

यावर्षी या पुरस्काराचे वितरण शरद कृषी भवन ओरस सिंधुदुर्ग नगरी या ठिकाणी रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालेला आहे.यामध्ये यावर्षी कुडाळ तालुक्यातून पाट हायस्कूलचे सहशिक्षक श्री प्रशांत सहदेव चव्हाण यांना नुकतेच कोकण रत्न पुरस्कार 2022 देऊन गौरवण्यात आलेल्या आहे

यावेळी व्यासपीठावर शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री बाळाराम पाटील, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विकास सावंत, लोकनेते श्री संदेश पारकर मराठा महासंघ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री सुहास सावंत , ऐतिहासिक व्याख्यानकार श्री प्रशांत देशमुख उपस्थित होते.

श्री प्रशांत चव्हाण यांची शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यात देखील त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे ते कुडाळ तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष, चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग सदस्य, चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ले उपाध्यक्ष, तसेच गावातील इतर सामाजिक संस्थांवर, मंडळांवर देखील ते कार्यरत आहेत.यापूर्वी त्यांना अखिल महाराष्ट्र चर्मकार समाजसेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय संत रोहिदास जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे.

त्यांना आज मिळालेल्या कोकण रत्न पुरस्काराने त्यांचे सर्व शैक्षणिक स्तरातून तसेच सामाजिक स्तरातून व गावातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा