भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख पदी सौ वैशाली राणे यांची नियुक्ती

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

सिंधुदुर्ग :

 

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख म्हणून मुंबईच्या सौ. वैशाली राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौ. राणे या अंशकालीन पदवीधर संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, सिंधुदुर्ग तालुका निहाय महिला संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी नियुक्ती केली आहे. कणकवली संपर्क प्रमुख सौ. शिवानी गावडे, सावंतवाडी संपर्क प्रमुख सौ. दीपिका राणे, कुडाळ संपर्क प्रमुख सौ. ममता परब, मालवण संपर्क प्रमुख सौ. सुषमा कुर्ले, दोडामार्ग संपर्क प्रमुख सौ. रुजुला पंडित, वैभववाडी संपर्क प्रमुख सौ. ज्योती सावंत, देवगड संपर्क प्रमुख कु. साक्षी कार्लेकर, वेंगुर्ला संपर्क प्रमुख सौ. प्राची राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा