कासार्डे येथे आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शन निकाल जाहीर*
तळेरे -प्रतिनिधी
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कासार्डे येथे आयोजित श्री.आर.व्ही. नारकर पुरस्कृत शैक्षणिक वर्ष सन.२०२३/२३ शालेय विज्ञान प्रदर्शनात तब्बल ३९ प्रतिकृतींचा सहभाग दर्शविला गेला असून, प्राथमिक गटातून कु.कुणाल राणे आणि दत्तराज केसरकर यांनी सादर केलेल्या ‘ग्रास कटर’ या प्रतिकृतीने तर माध्यमिक गटातून विघ्नेश पाताडे याने सादर केलेल्या ‘ग्रॅवेटी बेस्ड इलेक्ट्रिक जनरेटर’ या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी प्र.प्राचार्य एन.सी. कुचेकर, प्र.पर्यवेक्षक एस्.डी. भोसले, जेष्ठ शिक्षिका सौ.बी.बी.बिसुरे, विज्ञान शिक्षक एस्.व्ही. राणे, विज्ञान विभाग प्रमुख सौ.एस.एम. जाधव आदीसह अन्य मान्यवर तसेच विज्ञान व गणित विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
याप्रसंगी उद्घाटक डॉ.अरविंद कुडतरकर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणा-या अशा छोट्या छोट्या विज्ञान प्रदर्शनातूनच भविष्यातील मोठे वैज्ञानिक घडतील असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान १०वीतील कु.रिना सावंत हीने विज्ञानाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान प्रमुख सौ.एस.एम.
जाधव यांनी तर सौ. बिसुरे बी.बी. यांनी आभार व्यक्त केले.
चौकट
*३९प्रतिकृतींचा उत्स्फूर्त सहभाग-*
या शालेय विज्ञान प्रदर्शनाला विद्यालयातील प्राथमिक विभागातून (इ.५वी ते. इ. ८वी ) एकुण २०प्रतिकृती तर, माध्यमिक (इ.९वी ते. इ.१२वी ) गटात १९ प्रतिकृती अशा मिळून एकूण ३९ प्रतीकृती विद्यार्थ्यांनी मांडल्या होत्या.
*विज्ञान प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे-*
प्राथमिक गट:-
कु.कुणाल योगेश राणे व कु.दत्तराज दिगंबर केसरकर यांचा – प्रतिकृती -ग्रास कटर -प्रथम,
कु. लोकेश विनायक मेस्त्री व कुंवर रविंद्र रोग्ये प्रतिकृती- ‘धोका यंत्र ‘- द्वितीय क्रमांक तर कु.आर्यन अनिल नलावडे
याने सादर केलेल्या ‘स्मार्ट होम’- या प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
*माध्यमिक गटात -*
विघ्नेश विजय पाताडे, यांनी सादर केलेल्या ‘ग्रॅवेटी बेस्ड इलेक्ट्रिक जनरेटरने’ या प्रतिकृतीने -प्रथम क्रमांक,
चारुदत्त प्रविण पाताडे(अन्टी स्लिप अर्लम) या प्रतिकृतीने द्वितीय क्रमांक ,तर बाळु राजू जाधव याने सादर केलेल्या”अॅटो वाटर पंप या प्रतिकृतीने – तृतीय क्रमांक तर साईराज अनिल परब – याने सादर केलेल्या’ “भुकंप सुचक यंत्र या प्रतिकृतीला उत्तेजर्नाथ’ क्रमांक मिळाला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य,
पर्यवेक्षक, आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
कासार्डे: आर्. व्ही.नारकर पुरस्कृत शालेय विज्ञान प्रदर्शनात निरीक्षण करताना मान्यवर