*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हे ही दिवस जातील!*
बर्बादीची वादळ!संकटाची चाहूल
काळझोपेतून जागे व्हा
देशावर स्वतःपेक्षा जास्तीचं प्रेम करा
देशवासीयांनो चांगले नागरिक व्हा
आणि बघा!हे हि दिवस जातील…!
भ्रष्टाचार स्वतः करू नका
दुस-यालाही करू देऊ नका
जळमट साचलेली झटकून टाका
इथे-तिथे डोके टेकवू नका
स्वाभिमानी व्हा!हे हि दिवस जातील..!
धार्मिक दुजाभाव करू नका
जात-पात मोडीत काढून दूर करा
एकदिलाने सा-यांचे उत्सव साजरे करा
ताठमानेने देशाची मान उंच करा
एकजीव व्हा!बघा!हे हि दिवस जातील
सुंदर देश हा!त्याच वैभव जपा
स्वातंत्र्याकरता बलिदान दिले त्यांची स्मृती जपा….
देशासोबत आयाबहिणींचा सन्मान जपा
बंधुभावनेने प्रेम करा!नाती जपा..
आणि बघा!हे हि दिवस जातील…!
देशाकरता जगा!देशासोबत जगा!
अनुभवा!हे हि दिवस सदाकरता निघून जातील …!!!
बाबा ठाकूर