वारकऱ्यांशी साधला संवाद; विविध प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन….
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने शहरात काढण्यात आलेल्या आज दिंडीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी त्यांनी हितगुज साजली. यावेळी आपल्या मिरवणुकीत श्री. केसरकर सहभागी झाल्याचे पाहतात वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी भारावले.
सावंतवाडी शहरात आज जिल्हा वारकरी संप्रदायाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून शहरात आज फेरी काढण्यात आली. यावेळी भजन कीर्तन करू वारकऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली. ही दिंडी सुरू असताना त्या ठिकाणाहून मोती तलावाच्या कठड्याच्या उद्घाटनासाठी जाणाऱ्या केसरकर यांनी वाटेत थांबून वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांची हितगुज साधला. यावेळी वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर श्री. केसरकर तेथून मार्गस्थ झाले.