You are currently viewing समन्वय

समन्वय

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ज्येष्ठ लेखक कवी माधव वि. सातपुते (विगसा) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*समन्वय*
*********
शांत जला सारखे असावे जीवन
नित्य वाद विवादा टाळीत जावे

नित्यची समन्वयी विचार असावा
संघर्ष टाळून इप्सित साधित जावे

विवेकी , विज्ञानाची कास धरावी
स्वांतसुखाय जगती जगत रहावे

सभोवती , जरी वारे कलियुगाचे
अंतरात संस्कारांना जपत रहावे

श्रद्धा , भक्ती आधार सत्कर्माला
निर्मोही , निरागस जगतची रहावे

ब्रह्मांडी सत्ता सारी सर्वेश्वराची
याचेच भान सदा जीवास असावे
**************************
*रचना क्र.३५२/ २४/१२/२०२२*
*©️ वि.ग.सातपुते ( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा