*भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश समिती महाराष्ट्र राज्य (पश्चिम महाराष्ट्र) उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांचा लेख*
*घरोघरी मेडिकल*
आरोग्य हीच माणसांची खरी संपत्ती आहे. असा नियम पूर्वी होता कारणं. पूर्वी भेसळयुक्त पदार्थ नव्हते. मोकळी स्वच्छ हवा पाणी. विना खतांचे धान्य. भाजीपाला. विना औषधफवारणी असणारे खाद्यपदार्थ नव्हते. लोकांना ताज स्वच्छ निर्भेळ सकस दुध मिळत होतं त्यामुळे लोकांच्या तब्येतीची काळजी नव्हती. शेतात व अन्य ठिकाणी एवढे काम होत की लोकांना आपल्या तबीयत व आरोग्य याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र व्यायाम करण्याची गरज नव्हती .
कुस्ती. कब्बडी. खो खो. दांडपट्टा. तलवारबाजी. मैदाने. असे अनेक मैदानी खेळ होतें. कोणतीही पक्षपाती पणा नव्हता . राजकारण नव्हतं. सत्तेसाठी भाऊबंदकी नव्हती. असा खुशाल आणि आनंदी माणूस जगत होता कारणं लोकांच्या आशा आकांक्षा कमी होत्या. लोक शंभर वर्षे निरोगी जगत होतें. याचं कारण होत . पाणीपुरवठा प्रदुषण नाही. हवा प्रदूषित नाही. स्वच्छ निर्भेळ अन्न खाद्यपदार्थ नाही. वयानुसार धार्मिक विधी यासर्व आणि अशा अनेक गोष्टी त्यावेळच्या लोकानी पाळल्या आणि आपल जीवन आनंदमय जगले आज आपणांस हे सर्व कालबाह्य वाटत असतं.
काळ बदलला झपाट्याने लोकसंख्या वाढली त्याच बरोबर कचरा वाढला. लोकांना अन्न धान्य पुरवठा करण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान वापर सुरू झाला त्यामुळे बोगस बीयाणे. बोगस खते. वेळोवेळी अनेक घातक अशा औषधांची फवारणी. फळें फुले भाजीपाला. बाजरी गहू मका असी पिकं काळाच्या आणि वेळेच्या आगोदर तयार होण्यासाठी विविध केमिकल. याचा वापर होऊ लागला. मासे मटन हे सुद्धा भेसळयुक्त असेच आहे. चिकन आज भयानक वापरले जाते सर्व पक्षी औषधांच्या जोरावर वयाच्या अगोदर कापला जातो हेच चिकन गाऊन लोकांना हात पाय सांधेदुखी . पचनवयवसथा खराब होणे. मुल मुली हेच चिकन खाऊन कमी वयातच तयार होत आहेत हा सर्वात मोठा तोटा आहे.
आज मुलांची आई गरोदर असल्यापासून औषध सुरू होतं ते मुल जन्माला आल्यापासून वाढते वय तसाच औषधाचा दोष सुध्दा वाढतं आहे. मुलाची वयाच्या अगोदर केस पिकणे. मुलाची वेळेआगोदर नजर कमी येणे. शारीरिक कमजोर. मानसिक कमजोरी. खोकला. ताप. वारंवार सर्दी. कफ. आतड्यांचे आजार. नाक कान घसा आजार. हातापायाचेआजार. हाडांचे आजार. मांसाचे आजार. असे विविध आजाराने आज लोक ग्रासली आहेत. यासाठी कारणीभूत आहे अन्न खाद्यपदार्थ तेल विविध जीवनावश्यक वस्तू मधील वापरले जाणारे औषध केमिकल. यामुळे वेळे आगोदर विविध आजार आज मुल महिला तरुण वयोवृद्ध यांच्यावर आले आहेत.
गावातील तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये आज कुठंही आणि कोणतंही घर असं नाही कि तिथ आणि त्या घरांत औषध नाही. म्हंजे आज औषधांवर लोक जगली आहेत. खाण्यासाठी औषध. खाल्लेले पचवायला औषध. झोपेसाठी औषध. कमजोर घालविण्यासाठी औषध. अशा विविध शारीरिक आजारांसाठी आज प्रत्येक घरांत औषधांचे मेडिकल तयार झाले आहे.
माणसाला प्राचीन काळापासून वनस्पतींचे ज्ञान आहे कारण तो त्यांच्याशी नेहमी संपर्कात असतो. रेचक आणि झोपेचे पदार्थ देखील वनस्पतींमध्ये आढळतात. मानवाने त्यांचा अचानकपणे वापर केला असावा, ज्यामुळे त्यांचा परिणाम किंवा परिणाम त्यांनी अनुभवला असावा. द्राक्षांच्या किण्वनातून अल्कोहोल तयार करण्याची पद्धत मानवाला अनादी काळापासून ज्ञात आहे. तो प्राचीन काळापासून ऍनेस्थेटिक्स आणि विषामध्ये बाण वापरत आहे.
अनेक हजारो वर्षांपूर्वी, मानवाने उपचारांसाठी औषधांचा वापर करण्यात पुरेसा रस निर्माण केला होता. प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये औषधी तयार करताना यंत्रमंत्रादीचा तपशीलवार उल्लेख आहे. अथर्ववेदात अशा अनेक नियमांचे वर्णन आहे . चरक आणि सुश्रुत संहिता आणि निघंटूमध्ये शेकडो औषधांचे एकत्रित वर्णन आढळते . इतर प्रारंभिक वनस्पति सूचींमध्ये इजिप्शियन ‘आयबर्स पॅपिरस’ समाविष्ट आहे जे सुमारे 1,500 ईसापूर्व आहे. मध्ये संकलित केले होते हिपोक्रेट्स(460-377 ईसापूर्व) यांनी हर्बल औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आणि त्यांच्या लेखनात अशा 300 पदार्थांचा तपशील आहे. गॅलेन (130-200 एडी), एक यशस्वी रोमन वैद्य यांनी 400 औषधी वनस्पतींची यादी तयार केली. मध्ययुगात हे या क्षेत्रातील सर्वाधिक स्वीकृत पुस्तक होते.
औषध (अनेकवचन: औषधे ; इं फार्मास्यूटिकल ड्रग / मेडिकेशन) म्हणजे स्थूलमानाने वैद्यकीय निदान, तोडगा, उपचार व रोगप्रतिबंधक म्हणून वापरावयाचा रासायनिक पदार्थ होय. यामध्ये माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी वापरली जाणारी आतून घेण्याची व बाहेरून लावण्याची सर्व औषधे येतात. औषधे ही वैद्यकशास्त्राच्या महत्त्वपूर्ण संसाधनांपैकी एक आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्सा पद्धतींमध्ये यांचा उपयोग झालेला आढळतो.
औषधाचे आपल्या शरीरावर निरनिराळे परिणाम होतात. इतर औषधांचे किंवा पदार्थांचे विषारी परिणाम कमी किंवा नाहीसे करण्यासाठी सुद्धा औषधे वापरली जातात. वेगवेगळ्या रोगांचे निदान करण्यासाठी काही औषधे वापरली जातात. औषधांचे महत्त्वाचे उपयोग थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येतील.
** उपचारात्मक औषधे
** रोगनिदान करण्यासाठी वापरली जाणारी औषधे
** रोग बरा करण्यासाठी वापरली जाणारी औषधे
** शरीरातील घटकांची तूट भरून काढण्यासाठी दिली जाणारी औषधे
** प्रतिबंधात्मक औषधे
औषधांचे वर्गीकरण: औषधांचे वर्गीकरण करण्याच्या अनेक तऱ्हा आहेत: त्यांच्या रासायनिक गुणधर्मानुसार , औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार, औषधाचा प्रभाव दिसणाऱ्या शरीरसंस्थेनुसार, औषधयोजनेचे परिणाम इत्यादी अनेकविध तऱ्हांनी औषधांची वर्गवारी करता येऊ शकते.
औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार वर्गीकरण
औषधांचे ती घेण्याच्या वहनमार्गानुसार अनेक प्रकार आहेत.
**तोंडावाटे घेण्याची औषधे : सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा प्रकार आहे. हा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. परंतु काही वेळा ; जसे रोगी शुद्धीवर नसल्यास, त्याला जुलाब होत असतील तर किंवा औषध पोटातील आम्लामध्ये विघटीत होत असेल तर हा मार्ग वापरता येत नाही.औषधाची गोळी ही गोल, लंबगोल, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांत आणि रंगांमध्ये उपलब्ध असते. ही सहसा पाण्याबरोबर गिळली जाते. परंतु, चघळण्याची , आधी विरघळवून घ्यायची असेही प्रकार आहेत.
**. डोळ्यावाटे घेण्याची औषधे: सहसा डोळ्याच्याच विकारांसाठी असतात व त्यातील बव्हंश औषधांमध्ये निर्जंतुकीकरण करणारे औषधही असते.
**शीरेवाटे घेण्याची औषधे:
**त्वचेला लावण्याची औषधे
**. श्वसनमार्गे घेण्याची औषधे
** नाकावाटे घेण्याची औषधे
** कानावाटे घेण्याची औषधे
** गुदद्वारामार्गे आणि योनीमार्गे घेण्याची औषध.
औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी त्याचा नियंत्रित वापर होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य औषधे, योग्य रुग्णास, योग्य मात्रेत दिल्यानंतर ती योग्य मार्गाने, योग्य कालावधीसाठी वापरणे अपेक्षित असते.
1828 मध्ये वोहलरने युरियाचे संश्लेषण केले. यानंतर, कार्बन रसायनांद्वारे लाखो सेंद्रिय संयुगे संश्लेषित केले गेले. यापैकी बरेच नंतर मानवी आणि प्राण्यांच्या रोगांमध्ये मौल्यवान सिद्ध झाले. 1910 मध्ये पॉल एहरलिचने अर्फेनामाइन नावाचे औषध तयार केले. सिफिलीसच्या उपचारासाठी शोधण्यात आलेले हे ६०६ वे औषध होते . हे औषध केवळ अनेक वर्षांच्या संशोधनाचे अमूल्य परिणाम नव्हते, तर ते पहिले जंतुनाशक कृत्रिम औषध होते, ज्याचा जंतूंवर परिणाम झाला होता. जीवनसत्त्वे आणि संप्रेरकांच्या क्षेत्रात मौल्यवान संशोधन झाले असले तरी त्यानंतरच्या 25 वर्षांत केमोथेरपीमध्ये फारशी प्रगती झाली नाही .
आज सर्वत्र टोलेजंग दवाखाने उभे आहेत. सहा महिने झाले की डाॅ मजल्यावर मजले बांधत आहेत. कशामुळे आपण कधीच याचा विचार केला नाही.जिथ दवाखाना आहे तिथं मेडिकल नको कारणं त्या मेडिकल वाल्यांचे डॉ यांना पाकेट जातं आणि तयाची भरपाई गोरगरीब पेशंट यांना करावी लागते. कोणत्याही दवाखान्यात उपचार पध्दती व उपचार दरपत्रक लावलेले नाही. रूग्ण हक्काची सनद लावलेली नाही. डॉ वेळेवर हजर नाही. उपचार दरम्यान पेशंट मयत झाल्यास बील भरल्या शिवाय मयत नातेवाईक यांच्या ताब्यात नाही. असं विविध प्रकार राबवून आज डॉ दिवसाढवळ्या लोकांना लुटत आहेत. आपणांस सजग आणि हुशार होण्याची आजचं गरज आहे. औषधांचे गोळ्यांचे विविध रंग आणि रंग तयार करण्यासाठी वापरले जाणारे विविध रसायने केमिकल यामुळे म्हंजे रंगामुळे जर लोकांना कॅन्सर हृदयरोग असे घातक आजार होत असतील तर औषधं डोळ्यांमध्ये रंग वापरण्याची परवानगी कोण देत ?? इंजेक्शन सलाईन यामध्ये काय आहे डॉ आपणांस काय औषधं देतो ते कशापासून बनविले आहे. त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होणार. त्यांच्या किमती कोण आणि कश्याप्रकारे ठरवितात. या सर्व प्रश्नांचा आपणांस कधीच डॉ उलगडा का करत नाही. मग तो डॉ बोगस असावा अथवा त्याची डिग्री बोगस आहे कां याचा सुध्दा तपास आपणच करायला हवा कारणं आपणच औषध घेतोय खरोखरच ही सर्व जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभाग यांची आहे पण या विभागाला साखर झोप लागलेली आहे त्यासाठी त्यांना जाग करण्यासाठी तोफ डागण्या ची गरज आहे .
1935 मध्ये डोमाकने सल्फोनामाइड औषधांचा शोध लावला . बड्स अँड फील्ड्सने त्यांच्या कृतीची यंत्रणा स्पष्ट केली आणि त्यांनी मांडलेल्या तत्त्वाच्या आधारे मलेरियाविरोधी, अमीबिक आणि क्षयरोगविरोधी द्रव यांसारखी अनेक मौल्यवान औषधे तयार केली गेली . फ्लेमिंगच्या पेनिसिलिनच्या शोधाने औषधशास्त्राचा नवा अध्याय उघडला. आज आपल्याकडे स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरोमायसेटिन, सल्फा औषधे आणि टेट्रासाइक्लिन सारखी अनेक उपयुक्त प्रतिजैविके आहेत. आधुनिक शोधांमध्ये, ट्रँक्विलायझर्स आणि किरणोत्सर्गी समस्थानिक महत्त्वपूर्ण आहेत.
आज बी पी शुगर. लठ्ठपणा. उच्च रक्तदाब. कॅन्सर. मधुमेह. थायरॉईड. एच आय व्हि. ह्रदयविकाराचे विविध आजार. असे अनेक भयानक आजार आज आहेत यासाठी आपणच कारणीभूत आहोत कारण आपणांस सर्व काही तयार आणि जागेवर पाहिजे. गाडी आली व्यायाम चालण फिरणं बंद. संडास आल सकाळी शतपावली चालणं बंद. त्वचारोग आलं विविध सौंदर्य प्रसाधने साबन. केस पिकणे विविध तेल केमिकल शॅम्पू याचा वापर. वेळेच्या आगोदर म्हातारपण भेसळ औषधांचे सेवन. गावातील शहरातील तालुक्यातील. राज्यातील देशातील विविध औद्योगिक वसाहत त्यात कारखाने त्यातून निघणारे केमिकल . दुषित. पाणी. नदिपात्रात सोडणे यामुळे जलप्रदूषण. विविध मांगल्य नदिपात्रात सोडणे गणपती विसर्जन. अस्थि विसर्जन व अन्य पदार्थ यामुळे जल प्रदुषण. कारखाने. एम आय डी औधोगिक वसाहत यामधून निघणारा विषारी धूर यामुळे विविध घातक आजार. दुषित आणि जंतू रहीत पाणी शेतीला देणें यामुळे सर्व धान्य निर्मिती दुषित यामुळे लोकांचे आयुष्य कमी. टिव्ही मोबाईल यामुळे मानसिक आजार. फळें केमिकल पाऊडर यामुळे वेळे आगोदर पिकणे यामुळे माणसाला आतड्यांचे आजार. आज पान मावा अफु चरस गांजा तंबाखू दारू गुटखा.ज्ञव असे अनेक नशेचे पदार्थ सर्रास विक्री केली जात आहे आणि यांत आजची तरुण पिढी पुरती अडकली आहे हे सर्वात मोठे दुर्दैव आहे आपलं!
आजारामुळे आज जी लोक शासकीय निमशासकीय कार्यालयात नोकरी करत होतें. किंवा संघटित असंघटित कामगार कष्टाची कामे करणारे असे अनेक लोक महिला यांना आज ४० वर्षापूढे आपली कमाई पन्नास टक्के औषधांवर खर्च करावी लागत आहे. यासाठी व्यायाम खाणंपिणं. पाणी. यांसाठी लोकानी आजच ठाम निश्चय करणे गरजेचे आहे .
आयुष्य कमी आहे. आयुष्य अनमोल आहे. आपणं निरोगी रहा शंभर वर्षे जगा. आपण मेलो तर आपलया फोटोंवर हार घालण्याचे काम मुल मुली पत्नी मित्र सगेसोयरे करणारं बाकीचं कांहीच करू शकतं नाहीत.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859