You are currently viewing माजगाव येथील २ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू..

माजगाव येथील २ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू..

पाच डोस एकत्रित दिल्यामुळे कु.माही गावडेचा मृत्यू; कुटुंबीयांचा आरोप

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडीतील माजगाव येथील दोन महिन्याच्या चिमुकलीचा आज सकाळी दुर्देवी मृत्यू झाला. बालरोगतज्ञ डॉ. संदीप यांनी रेफर केल्यानंतर उपजिल्हा रूग्णालयातून देण्यात आलेल्या एकत्रित डोसमुळे मुलगी गमावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पाच डोस एकत्रित दिल्यानेच कु.माहीचा मृत्यू झाला असून तीच्या मृत्युबाबत सखोल चौकशी व्हावी, तीच पोस्टमॉर्टम बालरोगतज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी करु नये, अन्य वैद्यकीय अधिका-यांकडुन पोस्टमॉर्टम व्हावे अशी मागणी अॅड. चंद्रशेखर गावडे यांनी पोलिसांकडे केली आहे. चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांसह ग्रामस्थांनी उपजिल्हा रूग्णालयात जात डॉक्टरांना धारेवर धरल. पोलीस देखील घटनास्थळी दाखल होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधिक्षक डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेत परिस्थिती हाताळली. याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता डॉ. संदीप सावंत यांनी या प्रकरणावर खुलासा देणं टाळलं. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दुर्भाटकर यावर बोलतील अस सांगण्यात आल. मात्र, डॉ. दुर्भाटकर ऑपरेशन थियेटरमध्ये असल्यानं शेवटपर्यंत या प्रकरणाचा खुलासा झाला नाही. याप्रसंगी मयत मुलीच्या कुटुंबीयांनी आक्रोष केला. डॉक्टर काय म्हणाले ? असा सवाल पत्रकारांना केला. यावेळी आम्ही सरकारी रुग्णालयात मुलांना आणून चूक करतो का ? खासगी रूग्णालयातचं जाण योग्य होत. आमचा ‘जीव’ आज आम्हाला नाही झाला असा आक्रोष करत मयत मुलीच्या वडिलांनी हंबरडा फोडला.

माजगाव येथील अनिकेत व सौ. अनुराधा गावडे यांच्या कन्येचा जन्म होवुन दीड महीना झाल्यानंतर पुढील लसीकरण असल्याने 19 डिसेंबर रोजी पुढील लसीकरणाकरीता माहीला उपकेंन्द्र माजगांव येथे पालक घेऊन गेले असता तेथील सीस्टर डॉ. नाईक यांनी सांगीतले की आता हा डोस देऊ नका, बालरोगतज्ञांना कन्सल्ट करतच हे डोस देण्यास सांगीतले. त्याप्रमाणे दिनांक 23 रोजी कु· माही हीला उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे दुपारी 11.30 वा.चे दरम्याने आणले. उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे OPV-1, Penta-1, Rota-1, PCV-1, IPV-1 असे एकुण 5 डोस बालरोगतज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी देण्याकरीता रेफर केल्याने वरील पाच डोस एकत्रित शुक्रवारी 12.00 वा. चे दरम्याने दिले. त्यानंतर तीला घरी घेवून गेले असता सुमारे तासाभराने माही रडु लागली. डोस दुखत असल्यान%